फुल पॅन्ट न घालता बुद्धीबळ खेळल्याने काय होऊ शकतं? जाणून घ्या सविस्तर

0
तर किस्सा असा आहे की, सध्या जॉर्जियातील Tbilisi मध्ये चेस वर्ल्ड कप सुरु आहे. चेस खेळप्रकाराला विश्वात अत्यंत महत्वाचे स्थान दिले जाते.

या स्पर्धेत 128 पैकी 7 जण होते. भारताचा हुकमी एक्का म्हणजेच विश्वनाथन आनंद हा दुसऱ्याच फेरीत कॅनडाच्या अंटन कोव्हलोय या खेळाडुकडून हरल्याने बाहेर पडला. ही कामगिरी निश्चितच चेस जगत हादरवणारी होती. म्हणून अंटनकडून नंतर बऱ्याच अपेक्षा होत्या.

पण परवा तिसऱ्या फेरीच्या सामन्याच्या केवळ 3 मिनिट आधी तो खेळण्यासाठी हॉल मध्ये आला तेव्हा पॅन्ट न घालता शॉर्टस (थोडक्यात बरमुडा) घालून आल्याने त्याला व्यवस्थापनाने ड्रेस बदलून यायला सांगितलं.

पण 3 मिनिट आधी हे शक्य नव्हतं आणि अंटन केवळ एक पाठीवरची सॅक घेऊनच कॅनडावरून आला होता. म्हणून त्याने सवलत मागितली परंतु व्यवस्थापनाने त्याच काहीच ऐकून घेतलं नाही.

अंटन त्यानंतर हॉलच्या बाहेर निघून गेला. ते थेट विमानतळावरच. सामना खेळण्यासाठी तो परत न येता थेट कॅनडाला निघून गेला.

नंतर त्याने फेसबुकवर त्याच म्हणण मांडलं त्यात अंटनच्या म्हणण्यानुसार त्याआधीच्या दोन्ही फेऱ्याच्या सामन्याला तो तोच ड्रेस घालून आला होता.

पण तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही आणि ड्रेस बदलायला सांगण्यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे Arbiter पंचांनी त्याच्याबद्दल असला जिप्सीसारखा इथं येऊ नकोस ‘असे सुनावत तिथून त्यांना कपडे बदलण्यास सांगितले.’

त्यात मी पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण अपेक्षित होत तर तिथं गेल्यावर कळाल की मी काळ्या मोहऱ्यांनी खेळायचं आहे.
अशा वेळी माझ्या हातून काही चुकीच वर्तन घडण्यापेक्षा मग मी सरळ निघून जान पसंद केल.

तर व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार स्पर्धेला येण्यापूर्वीच FIDE ने खेळाडूंना Casual dress मध्ये न येण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

– विनायक वाडीले (लेखक बुद्धीबळ खेळाडू आहेत)

LEAVE A REPLY

*