देशद्रोही आहे तर आजवर चार्जशीट का दाखल केले नाही – कन्हैया कुमार

0
नाशिक |  देशद्रोहाच्या आरोपांवर बोलतांना ऑंल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार म्हणाले की, १८ राज्ये तुमची, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तुमचे, पंतप्रधान तुमचे, राज्यातले सरकार तुमचे मग आजवर माझ्यावर चार्जशीट का दाखल केले नाही. असा सवाल कन्हैया कुमारने उपस्थित केला.
कन्हैया कुमार यांची सभा नाशिकमधील तूपसाखरे लोन्स येथे आज सभा पार पडली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सभेची सुरुवात झाली. संविधानाची प्रस्तावना वाचून सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कन्हैया कुमार म्हणाले  देशद्रोहीचा आरोप माझ्यावर करण्यात आला. जिकडे जाव तिकडे हेच ऐकायला मिळते. माझा सरकारला प्रश्न आहे. जर मी देशद्रोही आहे तर देशात  १८ राज्यांत तुमची सत्ता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तुमचे आहेत. पंतप्रधान तुमचे आहेत. दिल्ली पोलीस तुमची आहेत महाराष्ट्र राज्यातले सरकार तुमचे  आहे मग आजवर माझ्यावर चार्जशीट का दाखल केले गेले नाही. असा सवाल कन्हैया कुमार याने विचारला आहे.

या सभेत नोटबंदी, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरी अत्याचार यावर कन्हैया कुमारने लक्ष वेधले. मोदी नेहमी म्हणतात गरीब का बच्चा हु तर  गेल्या तीन वर्षांत काय केले तुम्ही? पुन्हा एकदा २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही कामाला लागले आहात का? गेल्या १६ महिन्यात घरगुती इंधनाचे दर १९ वेळा वाढविण्यात आले. याला जबाबदार कोण. अशा अनेक मुद्द्यांना कन्हैय्या कुमारने हात घातला.

सुरुवातीला संविधान जागर सभेत आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना  आणि यवतमाळ येथे औषध फवारणीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. या सभेचे आयोजन छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कुमार यांच्या सभेचे आयोजन केले आहे.

नाशिकची टोपी घालून कन्हैया कुमारचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवरील  कन्हैया कुमारचे विचार ऐकण्यासाठी अनेक विरोध झाल्याचे ते म्हणाले. या सभेला जाऊ नये म्हणून बॅनर फाडले गेले, सभेला काही लोकांकडून विरोध परंतु नाशिककर ही सभा होण्यासाठी आग्रही राहिले  नाशिककरांनी दिलेल्या प्रतीसादाबद्दल त्यांनी आभार मानले.

कन्हैया कुमार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

  • आमची लढाई ही विचारांची लढाई, सिद्धांताची लढाई, आम्हाला कुणाचे सर्टिफिकेट नकोय आम्ही भगतसिंगचे विचार मानतो.
  • नोटबंदीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका…विजय मल्ल्या पळून जाण्यात मात्र यशस्वी.
  • भ्रष्टाचार निपटारा करणाऱ्या पंतप्रधानांनी एक-एक करत सर्व भ्रष्टाचारांना पक्षात सामावून घेतले आहे. मुकुलकुमार हे त्यांचे उदाहरण म्हणता येईल.
  • रस्ते कंपन्यांना बनवायला दिली तर तिथे टोल लागतो नंतर वर्षानुवर्षे टोलच्या नावाखाली नागरिकांची लुट होत असते.
  • राजकारण विनाकारण बदनाम केले जात आहे.
  • १९ वेळा १६ महिन्यात घरगुती इंधनाचे दर वाढविण्यात आले.
  • जर तीन लाख कोटी काळे धन तुम्ही आणले तर जपानहून एक लाख कोटींचे कर्ज घेऊन बुलेट ट्रेन आणण्याची गरज काय?
  • गरीब लोक प्रवास करू शकतील अशी ट्रेन आणा.
  • रोहित वेमुलाच्या आईला अजून न्याय का नाही मिळाला?
  • महिलांवरील अत्याचार का नाही थांबत?
  • शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीत हेच वर्तमानाचे प्रश्न आहेत…कुठे मंदिर व्हावे हा वर्तमानाचा प्रश्न नाही.
  • या देशात समानता आणावी लागेल केवळ सामजिक, राजनैतिक नाही तर सांस्कृतिक सुद्धा.
  • सभेत एकाचा गोंधळ, नंतर त्याला बाहेर काढले.

LEAVE A REPLY

*