#ICC : आयसीसीची टेस्ट चॅम्पिअनशिप आणि वन डे इंटरनॅशनल लीगला परवानगी!

0

आयसीसीने क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला असून आज झालेल्या बैठकीत टेस्ट चॅम्पिअनशिप आणि वन डे इंटरनॅशनल लीगला परवानगी दिली.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी आयसीसी नियामक मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून यासंबंधी चर्चा सुरु होता.

आयसीसीच्या या नव्या निर्णयानंतर वन डे प्रमाणे कसोटीतही चॅम्पिअनशिप खेळली जाणार आहे. कसोटी चॅम्पिअनशिपसाठी एकूण नऊ संघ सहभागी असतील. क्रमवारीतील पहिले नऊ संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पात्र असतील. प्रत्येक संघ एकूण सहा कसोटी मालिका खेळतील. सहा मालिकांपैकी तीन मालिका घरच्या मैदानावर, तर उर्वरित सहा मालिका प्रतिस्पर्धी देशात होतील.

2019 वर्ल्ड कपनंतर कसोटी क्रिकेटमधील या नव्या पर्वाला सुरुवात होईल.  प्रत्येक संघाला किमान दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते.

दुसरीकडे वन डे लीगमध्ये सहभागी होणारे संघ येथूनच थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करतील. वन-डे लीगमध्ये एकूण 13 संघ सहभागी असतील.

2020 पासून वन डे लीगची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. या लीगमध्ये प्रत्येक संघाला 8 मालिका खेळाव्या लागतील. यापैकी चार मायदेशात, तर उर्वरित चार प्रतिस्पर्धी देशात होतील. एका मालिकेत जास्तीत जास्त तीन वन डे सामने खेळवण्याची अट असेल.

 

LEAVE A REPLY

*