CT2017: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण टाईम टेबल; जाणून घ्या कधी कुठे आहेत सामने?

0
क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धेत गणना होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आयपीएलनंतर सुरुवात होणार आहे.

आयसीसीच्या नियमानुसार 25 एप्रिलपर्यंत संभाव्य संघाची घोषणा करायची आहे.

काल द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांनी आपल्या संभाव्या संघाची घोषणा केली आहे.

इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून 2017 दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी असा असेल भारतीय संघ?

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल राहूल, युवराज सिंग, एम.एस. धोनी, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहमद्द शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, मनिष पांड्या आणि यजुवेंद्र चहल

भारत-पाक सामन्याचे आकर्षण :

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही संघ एकाच गटात असून त्यांच्यात 4 जून रोजी एजबॅस्टन येथे सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेट मालिका बंद असल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धामध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक : 

1 जून – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

2 जून – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

3 जून – श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

4 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)

5 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

6 जून – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)

7 जून – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)

8 जून – भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)

9 जून – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)

10 जून – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

11 जून – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

12 जून – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)

14 जून – सेमीफायनल १ (कार्डीफ)

16 जून – सेमीफायनल २ (एजबॅस्टन)

18 जून – फायनल मॅच (ओव्हल)

LEAVE A REPLY

*