घरगुती वादातून पतीने केली कुऱ्हाडीने पत्नीची हत्या

0

नाशिक ता.  ९ : घरगुती भांडणातून एका माथेफिरू पतीने पत्नीवरच कुऱ्हाड चालवित तिला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कुरणावळी, ता दिंडोरी येथे पती प्रल्हाद माळी याने कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी मीना (26) हिचा केला खून केला. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*