एचपीटी पार्किंगच्या समस्या काही संपेनात; सीसीटीव्ही बंद

0

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून एच.पी.टी. आर्ट्स आणि आर. वाय. के. सायन्स महविद्यालयात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांंमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या पार्किंगमधील दुचाकींच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक अनेकांना ओळखपत्राशिवाय बिनदिक्कत प्रवेश देत असल्याचे चित्र वारंवार याठिकाणी निदर्शनास आले.

परिणामी सुरक्षा रक्षकांच्या या बेजबाबदार कारभारामुळे महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

प्रतिकात्मक

त्यामुळे  गेल्या महिन्यात मुलींच्या पार्किंगमधून सुरक्षा रक्षकांसमोरून दुचाकीची चोरी करण्यात आल्याची घटनाही घडली आहे. तसेच दुचाकींना लावलेले हेल्मेट चोरीला जाणे, दुचाकींची हवा काढणे असे प्रकार नियमित घडत असतात.

अशा परिस्थितीत नव्याने बांधण्यात आलेल्या स्टाफ पार्किंगमधील सीसीटीव्ही यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून बंद स्थितीत आहे. जवळपास दोन महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले.

त्यामुळे महाविद्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस गेल्यास त्याची भरपाई महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येईल का, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांमधून ही ओरड होत असताना महाविद्यालय प्रशासनाकडून मात्र कोणत्याही पध्दतीचे पावले उचलले जात नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सर्वच वाहनांची सुरक्षा वार्‍यावर आहे.

LEAVE A REPLY

*