अभ्यासासाठीच्या या दहा युक्त्यांचा जरूर अवलंब करा

0

आमचा मुलगा कधी सलग 2 तास अभ्यासाला बसला असं दिसतच नाही. दर 1 तासाने उठतो. त्यातही बारावीला आहे. स्पर्धा किती वाढली आहे. रामचे वडील रामच्या काकांना सांगत होते.

उत्तरादाखल रॅम लगेच म्हणाला मला अभ्यास करायचा कंटाळा येतो. त्यात नवीन असं काही वाटतच नाही. अनेक पालकांच्या मुलांबद्दल आणि मुलांच्या अभ्यासाबद्दल अशा तक्रारी असतात.

पण सतत अभ्यास केल्याने मुलांना तो लक्षात राहीलच असं नाही. अभ्यास करायच्या पण काही युक्त्या आहेत. ज्यामुळे मुलांचा अभ्यास देखील होईल आणि कंटाळा पण येणार नाही.

  1. कधीही फार तास सलग अभ्यासाला बसू नये. तासाभराने दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा.

2.सर्वात प्रथम अभ्यासासाठी टाइम टेबल बनवा. त्या टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करा. टाइम टेबल तुमच्या डोळय़ाला दिसेल अशा ठिकाणी लावावे.

  1. अभ्यास करताना पाठांतर न करता प्रथम प्रश्न व उत्तर नीट वाचा. समजून घ्या व ते समजल्यानंतर तुमच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे ते तुमच्या लक्षात राहील व पाठांतर करण्याची गरज नाही.
  2. वाचल्यानंतर एकदा ते हाताखालून गेले पाहिजे. म्हणजेच तुम्ही काय वाचलं ते बघून लिहा; पण एकदा तरी लिहा. त्यामुळे कधी कधी वाचलेले लक्षात राहत नाही; पण लिहिलेले राहते.
  3. फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.
  4. वीकेण्डला स्वत:ची परीक्षा घेऊन पुस्तकांप्रमाणे चेक करा किंवा पालकांना चेक करायला सांगा. त्यामुळे तुमचा सराव किती झाला हे तुम्हाला कळेल.
  5. वाचताना महत्त्वाची वाक्ये, शब्द, लाइन अधोरेखित करून ठेवत जा, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही पुस्तक चाळाल तर तुम्हाला ते वाचलेले पटकन लक्षात येईल.
  6. दररोज १५ मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवावा.
  7. दहावी किंवा १२वीच्या विद्यार्थ्यांनी सुट्टय़ामध्ये अभ्यासक्रमाची पुस्तके चाळावीत म्हणजे नवीन अभ्यासक्रम असल्यास डोळ्याखालून गेल्याने तुम्ही पुन्हा वाचाल तेव्हा ते तुम्हाला पटकन समजेल.
  8. पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित करावे व त्या ध्येयानुसार अभ्यास करून गुण प्राप्त करावे. तसेच जे क्षेत्र निवडायचे असेल त्याची पूर्व माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी त्या गोष्टीची सुट्टय़ामध्येच जमवाजमव करावी. आपल्या पाल्याला या टिप्स वाचायला सांगा ज्यामधून त्याला स्वत:ला कळेल की काय केले पाहिजे.

LEAVE A REPLY

*