#CycloneOckhi : जाणून घ्या ‘ओखी’ चक्रीवादळाच्या नावाचा इतिहास!

0

ओखी चक्रीवादळ केरळ, तामिळनाडूनंतर आता गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. याचा परिणाम काल रात्रीपासून मुंबईतही जाणवू लागला.

सोमवारी संध्याकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या 18 तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘ओखी’ नाव आलं कुठून? :

बंगाली भाषेत ‘ओखी’चा अर्थ डोळा होतो. सर्वप्रथम बांगलादेशने या चक्रीवादळाला ओखी असे नाव दिले. 2000 पासून उष्णकटिबंधीय वादळांना नाव देण्याची पद्धत सुरु झाली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ म्हटले जाते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर ओखी चक्रीवादळात झाले.

नाव देण्याची पद्धत कशी असते?

जसेजसे वादळ जागा बदलते तसे चक्रीवादळांना नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या आठ देशांनी वादळांची नावे  ठरवली आहेत. भारताने ‘अग्नी’, ‘आकाश’, ‘बिजली’, ‘जल’, ‘लहर’, ‘मेघ’, ‘सागर’ आणि ‘वायू’ अशी आठ नावे सुचवली आहेत.  इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी 64 नावे देण्यात आली. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.

यापूर्वी ओखी चक्रीवादळाचं नाव काय होतं?

यापूर्वी ओखी या चक्रीवादळाचं नाव ‘मोरा’ होते. हे नाव थायलंडकडून देण्यात आले होते. ओखीचे पुढील नाव हे ‘सागर’ असेल. हे नाव भारताकडून या चक्रीवादळाला देण्यात येईल.

LEAVE A REPLY

*