मराठी चित्रपटांचा गल्ला हिंदी चित्रपटांना?

0

चित्रपटगृहाचे मालक हिंदी चित्रपटांचा फायदा करून देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाला कात्री लागत आहे.

एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रीकर विभागाचे उपायुक्त दिलीप देशमुख नेरुळच्या मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘दशक्रिया’ चित्रपट पाहायला गेले होते. त्यावेळी त्यांना ‘ज्युली 2’ ची तिकीटे देण्यात आली.

रात्री 9 वाजता या चित्रपटाचा शो होता. देशमुख चित्रपटाला पोहोचले, त्यांना प्रवेशही मिळाला. पण मध्यांतरात सहज म्हणून तिकीट तपासले असता आपल्याला ‘ज्युली 2’ चित्रपटाची तिकीट मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याविषयी विचारणा करण्यासाठी देशमुख तिकीट काऊंटरवर गेले, पण त्यावेळी काऊंटर बंद होते. पण, यासारख्या घटना याआधीही घडल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे या प्रकारानंतर चित्रपटांच्या नावाने जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या गल्ल्यावर शंका उपस्थित होत आहे.

देशमुख यांनी ज्या चित्रपटासाठी पैसे मोजले तोच चित्रपट त्यांना पाहायला मिळाला. मात्र, तिकीटांची अदलाबदल केल्याने ‘दशक्रिया’ चित्रपटाचा गल्ला ‘ज्युली 2’ या हिंदी चित्रपटाच्या नावावर जमा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*