हायटेक तेजस ट्रेनवर लोकार्पण सोहळ्याआधीच दगडफेक

0

मुंबई : भारतीय रेल्वेची सुपरफास्ट हायटेक ट्रेन ‘तेजस एक्स्प्रेस’ सोमवारपासून धावणार आहे. पण त्याआधीच या ट्रेनवर अज्ञाताकडून दगडफेक करत काचा फोडल्याची घटना घडली आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील तेजस एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा, उद्या सोमवार (22 मे) रोजी होणार आहे.

यापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचे समोर आले आहे. दिल्लीकडून मुंबईकडे ही ट्रेन घेऊन जात असताना काचा फोडल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रेल्वेचा प्रवास २२ मे रोजी सुरू होणार आहे. पहिली रेल्वे मुंबई आणि गोवा या मार्गावरून धावणार आहे. अनेक नवी वैशिष्ट्ये आणि सोयीसुविधायुक्त असलेल्या या रेल्वेचे तिकीट दरही राजधानी आणि शताब्दीपेक्षा जास्त आहेत.

विमानातील सोयीसुविधा या रेल्वेत पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन, स्मार्ट स्वच्छतागृह, वायफाय आदी सुविधा या रेल्वेत प्रवाशांना मिळणार आहेत.

ही रेल्वे सुमारे २०० किमी इतक्या वेगाने धावू शकते. परंतु, भारतीय रेल्वे रूळ इतका वेग सहन करू शकत नसल्यामुळे ती कमाल १३० किमी इतक्या वेगाने धावू शकेल. रेल्वे रूळांत योग्य बदल केल्यास २०० किमी वेगाने रेल्वे धावू शकते.

अत्याधुनिक सुविधा असलेली ‘तेजस’ रेल्वे २२ मेपासून धावणार

LEAVE A REPLY

*