स्वाईन फ्ल्यूतील मृतांच्या वारसांना मदत

0

      वासुंदे व वडगाव ग्रामसभेत ठराव

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गटातील वासुंदे व वडगाव सावताळ मध्ये स्वाईन फ्ल्यूने दोन दिवसांत दोन जणांचा बळी गेल्याच्या घटनेने जनतेमध्ये घबराट परसरली असून मंगळवार (दि.23) रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मृताच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणगी जमा केली आहे.
वासुंदे येथील पंढरीनाथ रामकिसन झावरे (वय 35) यांचा शुक्रवार (दि.19) व वडगाव सावताळ येथील सिंधूबाई रावसाहेब खरमाळे (वय 46) यांचे शनिवार (दि.20) मे रोजी पुणे येथे केईएम हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान स्वाईन फ्ल्यूने बळी गेला. या पार्श्वभूमीवर वासुंदे येथील ग्रामसभेत सरपंच प्रतापराव पाटील, उपसरपंच महादू भालेकर, ग्रामविकास अधिकारी संपत दातीर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश कोल्हे, आरोग्य विभागाचे वालचंद ढवळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पाटोळे,
बा.ठ.झावरे, रविंद्र झावरे, संदीप झावरे, बाळासाहेब झावरे, रामचंद्र झावरे, पो.साळुंके, विमल झावरे, रा.बा.झावरे, पी.डी.बर्वे, सुंदरबापू झावरे, रामा झावरे, बबन गांगड, आरोग्य विभागाचे वाघमारे, पवार, जगताप, श्रीमती गदादे, खंडागळे, धुमाळ, तांबोळी, आशा वाळुंज, फलके, डहाळे आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ.करण नागपूरकर, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जाधव यांनी उपस्थिती लावली असून वासुंदे व वडगाव सावताळ गावाला भेट देऊन गावात जनजागृती करत मृत व्यक्तींच्या सहवासात आलेल्या लोकांची भेट घेवून उपाय योजना संदर्भात वैद्यकीय अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

शासनाच्या मदतीची प्रतिक्षा : प्रतापराव पाटील
स्वाईन फ्ल्यू चा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करून 19 व 20 मे रोजी वासुंदे व वडगाव सावताळ येथे स्वाईनफ्यूने दोन जणांचा मृत्यू झाल्याने या मृतांच्या वारसासाठी शासनाने विशेष तरतूद करण्याची गरज असल्याचे मत सरपंच प्रतापराव पाटील यांनी ग्रामसभेत व्यक्त केले. तर मृताच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमा करण्याचे ठराव केला असून जनतेनी देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले.

आढावा बैठकीत आरोग्य विभाग धारेवर
पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी तालुका आरोग्य बैठकीत स्वाईन फ्ल्यूच्या मुद्द्यावरून अधिकार्‍यांना धारेवर धरले. स्वाईन फ्ल्यूच्या जनजागृतीत आरोग्य खाते कमी पडल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. जाधव यांनी मान्य केले. सध्या वासुंदे येथील 11 तर वडगावसावताळ येथील 16 रूग्णांना दररोज निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून वासुदा येथील 5 तर वाडगाव सावताळ येथील 6 रूग्णांना स्वाईन फल्यू प्रतिबंधात्मक टॅमिफल्यु गोळ्या देण्यात आल्या आहे. ताप, खोकला, सर्दी झालेल्या रूग्णांनी तात्काळ सबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क साधून औषधोपचार करून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य काशिनाथ दाते व पुष्पा वराळ, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांच्यासह गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप चोपडे रूईछत्रपती, डॉ. समीर आढाव पळवे, डॉ. निलेश कोल्हे खडकवाडी, डॉ. शंकर डोईफोडे भाळवणी, डॉ. एस. एस. म्हस्के निघोज, डॉ. वैशाली घाडगे कान्हूरपठार आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*