हरसूल रस्त्यावर गोरठाणला दर रविवारी आठवडे बाजार

0

नाशिक । दि.1 प्रतिनिधी
हरसूल रस्त्यावर गोरठाण येथे आठवडे बाजाराचा शुभारंभ जि.प. सदस्य रूपांजली माळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दर रविवारी येथे आठवडे बाजार भरणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना परपेठेत जाण्याची गरज पडणार नाही.

यावेळी भाजप नेते विनायक माळेकर, दत्तू मुर्तडक, सरपंच शरद महाले, सदस्य पांडुरंग भडांगे, देवीदास भडांगे आदी उपस्थित होते. माळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, आसपास असलेल्या गावांना आठवडे बाजाराचा मोठा लाभ होणार आहे.

येथील बाजार वाढवण्यासाठी स्थानिक लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील इतर ठिकाणांहून व्यापारी गोरठाण येथे येणार आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे यावेळी माळेकर यांनी सांगितले.

गोरठाण हे हरसूल-त्र्यंबक-गिरणारे या तिन्ही बाजारपेठांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तालुक्यात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भातालाही बाजारपेठ उपलब्ध होईल. व्यापार्‍यांची संख्या वाढेल. व्यवहार करता येईल, तालुकाच्या ठिकाणी जाण्याचे प्रमाण कमी होईल.

आता गोरठाण तसेच आसपासच्या दहा गावांत त्यामध्ये प्रामुख्याने माळेगाव, वाघेरा, कोणे, साप्ते, गणेशगाव(वा), वेळुंजे, हेदुलीपाडा, हेडपडा, ना. कोहळी, वरसविहीर, पत्र्याचापाडा यांसारख्या गावांना फायदा होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. आठवडे बाजारामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते.

आठवडे बाजार दर रविवारी भरणार आहे. पोलीसपाटील वसंत भडांगे, सोमनाथ बदादे, विठ्ठल खेडुळकर, जय मल्हार मित्र मंडळाचे गणपत भडांगे, राजेंद्र दिवटे, ज्ञानेश्वर सकवद, पंकज नेमनोर, भास्कर भडांगे, पप्पू भडांगे, वसंत भडांगे, दत्तू वाटणे, ज्ञानेश्वर बिडगर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*