सुप्यात बड्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर हातोडा

0
सुप्याला छावणीचे स्वरूप, बांधकाम विभागाची मोठी कारवाई
सुपा (वार्ताहर) – नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथिल महामार्गालगत असलेल्या बड्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत मोठे बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी थंडावलेली कारवाईने पुन्हा एकदा जोर धरल्याने बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
मंगळवार (दि.28) रोजी झालेल्या कारवाईत सुपा बसस्थानक ते विश्रामगृहापर्यतचे अतिक्रमण हटविण्यात आले.
सुप्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यवसायिकांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता श्रीरंग देवकुळे, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस अधिक्षक मनिष कनिवालनिया, नायब तहसिलदार दत्तात्रय बाहुले, सुपा पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील, उपनिरिक्षक बी.जे पठाण, हे.कॉ.अजय नगरे, शिवाजी ढवळे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग व चेतक एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 11 नोव्हेंबर रोजी गव्हाणवाडी पासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण (अतिक्रमण बाकी), पारनेर( गोळीबार फाटा),जातेगाव फाटा, मठ वस्ती, म्हसणे फाटा,वाघुंडे, सुपा एम आय डि सी चौक ते सुपा बसस्थानकासमोरील मेन चौकातील अतिक्रमण हाटवल्याने रस्त्याचा दुतर्फा स्वास मोकळा झाला आहे.
गेल्या 10 ते 12 वर्षापासून अहमदनगर ते गव्हाणवाडी अतिक्रमणामुळे अरुंद झाला होता. रस्ता अरुंद झाल्याने आपघाताचे प्रमाण वाढले होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले होते. मात्र बांधकाम विभागाच्या कारवाईने आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी अचानक मोठा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ झाल्याने सुपा चौक ते विश्रामगृह रस्त्यावर छावणीचे स्वरूप आले होते.

LEAVE A REPLY

*