जीएसटी विरोधात बुधवारी नगरमधील कापड दुकाने बंद

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – सुरत, अहमदाबाद व देशातील विविध राज्यांनी कापडावरील जीएसटी रद्द करावा. या मागणीसाठी 26 ते 28 जूनपर्यंत कापड दुकान बंद ठेवून संप पुकरला आहे. या संपास पाठिंबा म्हणून अहमदनगर कापड व्यापारी संघाच्यावतीने बुधवारी (दि. 28) शहरातील सर्व कापड दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष शामसुंदर सारडा यांनी दिली.
सारडा यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले की, कापड ही मनुष्यासाठी मूलभूत आणि गरजेची वस्तू बनली आहे. जीएसटी लागू करण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये कापडाचा समावेश आहे. यामुळे कपड्याचे दर वाढणार असून त्याचा फटका समान्य नागरिकांना बसणार आहे.
यामुळे जीएसटी कापडावर लावू नये, यासाठी देशातील अनेक राज्यात कापड दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवित आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरातील सर्व कापड दुकाने बुधवार ठेवण्यात येणार असून कापड दुकानदारांच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

LEAVE A REPLY

*