द्राक्ष चर्चासत्रात द्राक्षबाग व्यवस्थापन मार्गदर्शन

0
नाशिक : द्राक्ष हंगामात उष्णतेचे प्रमाण हा द्राक्ष उत्पादकांना डोकेदूखी ठरत आहे. चालू हंगामात त्याचा मोठा फटका द्राक्षांना बसला आहे. आगामी हंगामात द्राक्षांना खत, संजीवके आदींचा वापर करताना सतर्कतेची गरज आहे.

कीडप्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्‍या कीटकनाशकांचा वापर रेसीड्यु प्रमाणात राखला जावा, असे मार्गदर्शन द्राक्ष चर्चासत्रात शेतकर्‍यांना करण्यात आले.

रावसाहेब थोरात सभागृहात राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागाच्या वतीने द्राक्ष बागाची एप्रिल खरड छाटणी व द्राक्ष बागेचे व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष माणिकराव पाटील, कृषी अधिकारी नरेंद्र आघाव, विलास शिंदे, अशोक गायकवाड आदींसह द्राक्ष विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर उपस्थित होते.

चर्चासत्रात पुणे येथील एनआरसीजीचे संचालक डॉ एम.डी.सावंत, डॉ. ए.के. उपाध्याय, डॉ.आरजी.सोमकुंवर, डॉ. एसटी रामटेेके, डॉ. दिपेंद्रसिंग यादव आदी मान्यवर सहभागी झाले होते.

द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांना यंदा झालेल्या आर्थिक नुकसानीसारख्या संकटांना कसे सामोरे जावे, याचे मार्गदर्शन करतानाच द्राक्ष बागेची एप्रिल महिन्यातील खरड छाटणी आणि द्राक्ष बागेचे व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

द्राक्षांना उन्हाचा तडाखा बसल्यानंतर साखरेचे वाढणारे प्रमाण चवीवर परिणाम करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याबरोबर निर्यातक्षम द्राक्षांची तयारी करताना संजीवके, कीटकनाशके यांचे प्रमाण द्राक्षांवर कमी-कमी कसे ठेवावे,याचे सौदाहरण यावेळी देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातून द्राक्ष उत्पादक चर्चासत्राला उपस्थित झाले होते.

LEAVE A REPLY

*