ग्रामपंचायतीच्या निधीवर ग्रामसेवकाचा ‘डल्ला’

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव Jalgaon। पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी ग्राम पंचायतीमध्ये Satgaon Dongri Gram Panchayat 14 वित्त आयोगाअंतर्गत 14 Finance Commission प्राप्त झालेल्या निधीतून रंग-रंगोटीसह इतर कामे न करता, निधी परस्पर वळता Funds reciprocate केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी Complaint by Gram Panchayat members जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे Deputy Chief Executive Officer of Zilla Parishad केली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करुन ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासनाकडून आलेल्या निधीचा विनियोग करत असतांना कोरोना महामारीच्या नावाखाली बँकेतून निधी काढून गावातील अर्धवट स्वरुपात काही कामे केली तर, ग्रामपंचायतीचा वीजबील भरणादेखील केलेला नाही,.

अंगणवाडीमध्ये साहित्य खरेदी, घंटागाडी दुरुस्ती, विहिरीमध्ये टीसीएल पावडर, अंगणवाडीच्या मुलांना गणवेश अशा ग्रामपंचायतीच्या सुविधांमध्ये भर न टाकता, गावात कुठेही परिपूर्ण काम केलेले नसून, खोटे बील सादर करुन लाखो रुपयांच्या अपहार केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करुन ग्रामसेवकावर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल. असा इशारा ग्राम पंचायत सदस्या कांताबाई पाटील, सागर चौधरी, भिला पवार, रायसा तडवी, रिंकू मराठे, अण्णा मराठे, आकाश डांबरे यांच्यासह गावातील नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन डेप्युटी सीईओंना दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *