Friday, April 26, 2024
Homeनगरपाथर्डी तालुक्यात 105 उमेदवार बिनविरोध

पाथर्डी तालुक्यात 105 उमेदवार बिनविरोध

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींपैकी तीनखडी, सोमठाणे खुर्द व खेर्डे यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. सदस्यपदाच्या जागेसाठी

- Advertisement -

2425 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 53 अर्ज छाननीत बाद झाले. तर 872 अर्ज माघारी घेण्यात आले. 105 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

उर्वरित 575 सदस्यांच्या जागेसाठी 1321 जण निवडणूक रिंगणात आहेत.कासार पिंंपळगाव, अकोला, खरवंडी, माणिकदौंडी, मिरी, सुसरे, हनुमानटाकळी, आल्हनवाडी, तोंडोळी, दैत्यनांदूर, येळी या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. मिरी व येळीमधे तीन पॅनल रिंगणात असल्याने तिरंगी लढती होत आहेत. अकोला, माणिकदौंडी, कासार पिंपळगाव, खरवंडी, हनुमान टाकळी, आल्हगनवाडी येथे दुरंगी लढती गाजणार आहेत. कासार पिंपळगावात सरपंच मोनाली राजळे व अर्जुन राजळे यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे.

मिरीमध्ये माजी सरपंच सतोष शिंदे, एकनाथ झाडे यांचा एक साहेबराव गवळी व महादेव कुटे यांचा दुसरा तर पंचायत समितीचे सदस्य राहुल गवळी यांचा तिसरा असे तीन पॅनल लढत आहेत. येळी गावात सरपंच संजय बडे व महादेव जायभाये यांच्यात सरळ सामना होत असला तरी तिसर्‍या आघाडीतील युवकांनी येथे चांगलीच लढत सुरू केली आहे. माणिकदौंडीत दोन्ही स्थानिक आघाड्यांत संघर्ष पेटला आहे. आल्हनवाडीत राधाकिसन कर्डिले व मच्छिंद्र गव्हाणे यांच्यात जुनाच संघर्ष आहे. जवखेडे दुमाला येथे सरपंच सचिन नेहुल व विरोधी गटामध्ये निवडणूक रंगत आहे. मोहोज देवढे गावात 11 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्या. सुसरे येथील 5 जागा, पत्र्याचा तांडा 6, मोहटा 4 जागा बिनविरोध झाल्या आहेत. औरंगपूर तीन, जाटदेवळे 4, चिंचपूर इजदे 2, तोंडोळी दोन, सोमठाणे नलवडे 3, शेकटे चार, जवळवाडी 3, खांडगाव 3, मोहोज खुर्द तीन, मोहोज बुद्रुक,लांडकवाडी दोन अशा सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या