धरणे आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष; शेतकर्‍यांमध्ये नाराजी

0
पुणतांबा (वार्ताहर) – हे सरकार शेतकर्‍यांचे कैवारी आहे, असे म्हणणारे शेतकर्‍यांच्या आंदोलनास का भेट देत नाही. शेतकर्‍यांचे म्हणणे का ऐकून घेत नाही, याबाबत शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा ग्रामस्थ व्यापारी यांनी आज रविवार दि. 28 रोजी पुणतांबा बंदचे आवाहन करून धरणे आंदोलन व संपाला पाठिंबा जाहिर केला आहे. बाळासाहेब देशमुख बीड, बाळासाहेब कदम, विजय माताडे, कैलास सांगळे, दिनेश जगताप, अरुण येवले कोपरगाव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी धनंजय जाधव, धनंजय धोर्डे, सुहास वहाडणे, विलास जगदाळे, हनुमान बोर्डे, रामदास बोरबने, भागवतराव धनवटे, कृष्णराव जाधव, धनंजय शिंदे, मच्छिंद्र भालेराव, भारु थोरात, मधुकर जाधव, दादा सांबारे, भानुदास पेटकर, गोविंद बोरबने, किरण सुराळकर, नामदेव बोरबने, रावसाहेब गायकवाड, कैलास डोखे, देवीदास डोखे,
ज्ञानेश्‍वर गांगड, रावसाहेब वैद्य, सतीष महाडिक, संजय बोर्डे, रविंद्र धस, संतोष गायकवाड, गुलाबराव सांबारे, प्रशांत वाघ, गंगाधर धनवटे, जालिंदर डगळे, सोपान धनवटे, देवीदास डोखे, नारायण कणसे, सुभाष सोनवणे, नवनाथ बोर्डे, प्रताप वहाडणे, संजय जाधव, बाळासाहेब जाधव, संभाजी गमे, प्रशांत राऊत, सतीश जाधव, सुधाकर जाधव, पप्पू डोखे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
धरणे आंदोलनातील शेतकर्‍यांना मातुलठाण ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था केली. सायंकाळी पाच वाजता आंदोलक शेतकर्‍यांनी आर्थिक मदतीसाठी हातात झोळी घेऊन स्टेशन रोड, व्यापारी, भाजी विक्रेते यांच्याकडून स्वइच्छेने देईल ती आर्थिक मदत घेतली. शेतकरी संपाची कल्पना राज्यभर पुढे आणणार्‍या पुणतांबेकरांनी धरणे आंदोलनात अनेकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

LEAVE A REPLY

*