गुगलच्या फोटोस्कॅप ॲपने जतन करा मौल्यवान आठवणी

0

गुगलने आता फोटोस्कॅन नावाचे नवे ॲप मार्केटमध्ये आणले असून अँड्रॉईडच्या वापरकर्त्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे.

आपल्या मोबाईलद्वारे फोटो स्कॅन करण्याकडे स्मार्टफोनधारकांचा कल वाढत आहेत. त्यासाठी बाजारात अनेक ॲपही उपलब्ध आहेत.

मात्र पाहिजे तसा फोटोंचा दर्जा त्यावरून मिळत नसल्याने मोबाईल स्कॅनबाबत अनेकजण असमाधानी असत.

गुगल फोटोस्कॅन ज्या फोटोचे स्कॅन करायचे आहे, त्याच्या चार प्रतिमा घेतो. त्या एकत्र करून एक चांगल्या दर्जाची प्रतिमा तयार होते.

अनेकदा फोटो स्कॅन करताना कॅमेऱ्याचा फ्लॅश लाईट आणि उजेडामुळे फोटो चमकतो. फोटोस्कॅन ॲपमध्ये  हा प्रकार टाळून जास्तीत जास्त दर्जा मिळतो.

आपल्या कौटुंबिक अल्बममधील जुन्या फोटोरुपी आठवणींचे घरबसल्या डिजिटायझेशन करणे या ॲपमुळे सोपे झाले आहे.

LEAVE A REPLY

*