आता राज्यभर ‘गुड मॉर्निंग पथके’; हागणदारी मुक्तीसाठी राज्य सरकारचा निर्णय

0
मुंबई : उघड्यावर शौचास बसू नये. घरी लवकरात लवकर शौचालय बांधावे यासाठी अनेक ठिकाणी गुड मॉर्निंग पथकाने जनजागृती केली.

जो सकाळी उघड्यावर शौचास बसेल त्याचे हे पथक कधी हार घालून तर कधी ढोल ताशे वाजवून स्वागत करायचे. जनजागृतीच्या या गांधीगिरी प्रकाराला चांगलाच प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी मिळालेला प्रतिसाद बघून आता नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी राज्य सरकारने ‘गुड मॉर्निंग’ पथके तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध आहे की नाही, याचा आढावा घेण्याची जबाबदारी ‘गुड मॉर्निंग’ पथकांवर असेल.

ही पथके संपूर्ण राज्यभरात कार्यरत राहणार असून ’गुड मॉर्निंग’ पथकांमध्ये स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वावलंबी गट, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी तसेच मल:निसारण व परिसर स्वच्छतेसंबंधी काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश राहणार आहे.

गुड मॉर्निंग पथकाकडे प्रलंबित शौचालय बांधकामाच्या मुद्दय़ावर प्रशासनाला जलदगतीने कार्यवाही करण्यास भाग पाडण्याचा अधिकारही असणार आहे. तसेच जर शौचालय सुविधा उपलब्ध असतानाही नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचे आढळून आल्यास दंड ठोठावला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*