गोकुळ अष्टमीनिमित्त मुरलीधर मंदिरात कृष्णजन्माचा कार्यक्रम

0

नाशिक, ता. १५ : गोरेराम गल्लीत पेशवेकालिन मुरलीधर मंदिरात आज मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माचा कार्यक्रम झाला.

यावेळी राधेकृष्ण गोपालकृष्ण असा गजर करून गुलाल आणि फुलांची उधळण करण्यात आली.

महादेव पथकाने ढोलवादन करून वातावरणात चैतन्य आणले.

यावेळी शेकडो भाविक हजर होते. श्रीकृष्ण जन्मानिमित्त सप्ताहभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.

रोज वेगवेगळ्या रुपात श्रीकृष्णाला दाखविले जाते. आज गोकुळ अष्टमीनंतर उद्या काल्याचे किर्तन होणार आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1822319161115069&id=234968153183519

LEAVE A REPLY

*