#FU: जयवंत वाडकर यांची मुलगी लवकरच दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर

0
अनेक सेलिब्रिटी किड्सनी आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले.
आता हाच ट्रेंड हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही दिसून येतोय.
काही दिवसांपूर्वीच अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, उदय टिकेकरांची कन्या स्वानंदी टिकेकर, मोहन गोखलेंची कन्या सखी गोखले यांनी अभिनय श्रेत्रात पदार्पण केले.
आता आणखी एक स्टारकिड सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी वाडकर.
स्वामिनी लवकरच ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसरसोबत सिल्व्हर स्क्रिन शेअर करताना दिसणारेय.
महेश मांजरेकर दिग्दर्शक FU या सिनेमातून स्वामिनी अभिनय करिअरचा श्रीगणेशा करतेय. 8 मे 1995 रोजी जन्मलेली स्वामिनी आता 22 वर्षांची असून तिला नृत्याची विशेष आवड आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित FU या सिनेमाच्या टीजरमध्ये स्वामिनीची झलक बघायला मिळतेय. या सिनेमात आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, मयुरेश पेम, माधव देवचक्के, मधुरा देशपांडे ही कलाकारांची नवी फळी बघायला मिळणारेय.
येत्या 2 जून रोजी स्वामिनीचा पहिला वहिला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.

LEAVE A REPLY

*