बोअरवेलचे आमिष दाखवून शेतकर्‍यांना गंडा

0
सुरगाणा | दि. १० प्रतिनिधी- ‘दोन हजारात शेतक-यांना बोअरवेल काढून देतो ’ या नावाखाली तालुक्यातील शेतकरी व बोअरवेल वाहन मालक यांना लाखो रुपयांचा गंडा घालून एका तोतया अधिकार्‍याने हातावर तुरी देवून पळ काढला आहे. या फसवणूकीने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बोअरवेलच्या नावाखाली पैसा उकळणार्‍या लबाडाची चर्चा सध्या तालुकाभर चर्चा रंगली आहे. या फसवणूकीने हजारो शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांवर बोअरवेल मालकांना लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागल्याने बोअरवेल मालक व शेतकरी शोधात आहेत. राजू जाधव नावाने ओळखला जाणारा एक बावीस ते पंचवीसीतला तरुणाने हा गंडा घातला असून तो सध्या फरार झाला आहे.

सात ते आठ बोअरवेल मालकांचे चाळीस ते पन्नास लाख रुपये बुडवून फरारी झाला आहे. तालुक्यातील शेतकर्‍याना दोन हजारामध्ये दोनशे फुट बोअरवेल काढून देण्यासाठी मला आदिवासी विकास मंत्रालय मुंबई येथून मंत्रालयाचा सचिव म्हणून पाठविले आहे.

आदिवासी भागात अनेक योजना पोहोचत नाहीत त्यामुळे मंत्रालय ते डायरेक्ट संबंध शेतकरीअशी योजना असून मधल्या दलालांना फाटा देऊन सव्वीस प्रकारच्या योजना आदिवासी शेतक-यांकरीता आपण राबविणार आहोत असे सांगून शेतकरी व बोअरवेल मालकांचा विश्वास संपादन करून काहींना दोन हजारात दोनशे फुट बोअरवेल काढून दिल्याने आणखीन शेतक-यांचा विश्वास ठामपणे बसला.

एवढ्या कमी रक्कमेत काम होत नसेल ती कोणाला नको हवे आहे. सदर योजना फायदेशीर आहे म्हणून अनेकांनी सातबारा, खाते उतारा, रेशनकार्ड, आधार कार्ड, दोन छायाचित्र अशी कागदपत्रे घेऊन संगणकावर आनलाईन नोंदणी करावी लागते असे सांगून शेतक-यांना पटवून दिले.

या गुन्हेगाराने गावोगावी संपर्क करून योजना लाभदायक आहे म्हणून हजारो शेतकरीवर्ग सामील झाले. हि वार्ता कानोकानी तालुकाभर पसरली होती. त्यामुळे अनेकांनी प्रस्ताव सादर केले. राजू जाधव रात्री उशिरा गावोगावी शेतकर्‍यांच्या बैठका आयोजित करून योजनेचे महत्व पटवून देत होता.

ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांना मोबाइलवर फोन करून कामे नीट न केल्यास तुमचा मंत्रालयात निलंबनाचा प्रस्ताव पाठवतो असे सभेत सर्वासमोर अधिकार्‍यांना धमकी देऊन इतरांवर प्रभाव टाकत होता .म्हणून हा जाधव खराखुरा सचिव आहे असे शेतक-यांना वाटत असे. कृषी अधिकारी डमाले यांना धमकावले असता ते घाबरून गेले. सेवा निवृत्तीस आलेले कृषी अधिकारी घाबरुन गेले.

त्यांनी अक्षरशः माफी मागितली. साबरदरा हे कार्यालयाचे मुख्य ठिकाण होते. तेथून सर्व सूत्रे हाकलली जात होती. परंतु ंही फसवणुक असल्याचे लक्षात आले.जाहुले, मनखेड, हस्ते, चिंचले, वडपाडा, रघतविहीर, माणी या गावातील शेतक-यांना गंडा घातल्याचे उघडकीस आले.या भामटयाला अटक करण्यात आली. भामटयांने सुकलाल रामचंद्र पवार अशी वेगवेगळी नावे पोलिसांना सांगितले .

या भामटयांस नाशिक येथील सरकारवाडा पोलिसांनी अटक केली होती मात्र तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने त्याला सोडून देण्यात आले असे बोलले जात आहे. भामटा काल शुक्रवारी कळवण येथे स्टेट बैंकेत पैसे काढण्याठी जात असताना प्रत्यक्ष दर्शीने सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . शेतकरी मात्र दोन हजारात बोअरवेल मिळते म्हणून आतुरतेने वाट बघत आहेत. तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे तपास करता येत नाही असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*