वसुंधरा महोत्सवात ४० लघुपटांचे सादरीकरण

0
नाशिक | शहरात कालपासून सुरु झालेल्या चार दिवसीय ‘किर्लोस्कर वसुंधरा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट सादरीकरणाचा कार्यक्रम आजपासून ३ शाळा व महाविद्यालयांमध्ये पार पडला. या कार्यक्रमात तज्ञ विरेन चित्राव, अमित टिल्लू यांनी विद्यार्थ्यांना महोत्सवाच्या ‘नद्या वाचवा, जीवन वाचवा’ या विषयाशी निगडीत बाबींवर पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला.

अंबड येथील महानगर पालिकेचे विद्यालय तसेच पुणे विद्यार्थी गृह आणि मविप्र समाजाचे कॉलेज ऑफ सोशल वर्क या महाविद्यालयात चित्रपटांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी महोत्सवाच्या विषयावर आधारित गप्पीज जर्नी, टुगेदर पॉसिबल, प्लास्टिक प्लानेट, ग्रीन आर्मर, द डाइंग प्लानेट, गणपती बाप्पा मोरया, एव्हरी ड्रॉप काउंट्स, माय होम इज ग्रीन, द यंग गार्डीयन्स हे चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.विद्यार्थ्यांसोबत या फिल्म्सविषयी चर्चा घडवून आणण्यात आली. या फिल्म्सला व फिल्म्स विषयीच्या चर्चेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.

सलग आठव्या वर्षी शहरात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचा विषय असलेल्या ‘नद्या वाचवा, जीवन वाचवा’ बाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील देण्यात आला. कुसुमाग्रज फिल्म सोसायटीचे हेमंत बेळे, योगेश एकबोटे, यतीन कुलकर्णी, शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात सादर होत असलेले लघुपट :

गप्पीज जर्नी : लहान मुलांसाठी असलेल्या या छोट्या अॅनिमेशनपटात गंगेच्या प्रदूषित पाण्यात राहणाऱ्या छोट्या गप्पी माशांचा संघर्ष दाखवला आहे.

टुगेदर पॉसिबल : एकत्र येऊन आपण एक अस जग निर्माण करू शकतो जिथे माणसे निसर्गाबरोबर सौहार्दाने राहतील.

प्लास्टिक प्लॅनेट : हा एक अॅनिमेटेड संदेशपट आहे. प्लास्टिकचा वापर कमी करून आपल्या पृथ्वीला प्लास्टिक प्लनेट होण्यापासून वाचविणे कसे गरजेचे आहे हे या लघुपटात सांगितले आहे.

द यंग गार्डीयन ऑफ मॅनग्रुव्हज : १९९२ सालात केरळ मध्ये सुमारे ७०० चौरस किमी लांबीची पाणथळी जंगले होती. मात्र फक्त १७ चौरस किमी एवढीच उरली आहेत. हा लघुपट उत्तर केरळमधील एका लहान मुलाची गोष्ट सांगतो. त्यांनी आपल्या मित्रमंडळीच्या सहकार्याने शाळेजवळ मोठ्या प्रमाणात पाणथळीची जंगले लावण्याचा उपक्रम हाती घेऊन तो यशस्वीपणे पूर्ण करतो असा प्रवास दाखविण्यात आला आहे.

त्याचबरोबर ग्रीन आर्मर, द डाइंग प्लानेट, गणपती बाप्पा मोरया, एव्हरी ड्रॉप काउंट्स, माय होम इज ग्रीन तसेच इतर महत्वपूर्ण चित्रपट दाखविण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

*