Friday, April 26, 2024
Homeनगरबिरसा ब्रिगेड संघटनेकडून भांगरे व बिरसा यांच्या प्रतिमा मलिन करण्याचे काम -...

बिरसा ब्रिगेड संघटनेकडून भांगरे व बिरसा यांच्या प्रतिमा मलिन करण्याचे काम – माजी मंत्री पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा जन्म अकोले तालुक्यातील देवगाव या आदिवासी भागात झाला. ब्रिटिश सरकार व सावकार शाहीच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. मात्र आज या क्रांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा मलिन करण्याचे डाव बिरसा ब्रिगेड संघटना करत असून आदिवासींना भुलथापा देऊन त्यांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी आदिवासी समाजाने जागृत रहावे असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.

- Advertisement -

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्त जागतिक स्वाभिमान व गौरव दीन कार्यक्रम शेंडी येथील माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. भंडारदरा येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री पिचड हे अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

माजी मंत्री पिचड म्हणाले, देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात आदिवासी जनजाती दीन म्हणून बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून देशात आदिवासींसाठी स्वतंत्र विद्यापीठ नागपूर नाशिकला करावे व आदिवासी साठी देशात वेगळे बजेट करावे, अशी मागणी करणार आहे. टाकेद जवळील सोनूशी येथे राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यास सुरुवात झाली असून या कार्यक्रमात शरद पवार हे देशाचे नेते आहेत.

मात्र ब्रिगेड चा नेता ज्याच्यावर अत्याचार प्रकरणी गुन्हा असताना तो कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष कसा असा सवाल करून क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम करत असून ते सहन केले जाणार नाही. याबाबत अनेक आदिवासी भागातील महिला, सरपंच, तरुण कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त करून संबंधितांनी माफी मागितली नाही तर याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याप्रसंगी प्रा. डॉ. सुनिल घनकुटे यांनी भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास सांगितला. प्रा. अनिल डगळे यांनी पुणे विद्यापीठात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या वर पी.एच.डी. केली असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुरेश भांगरे, गंगाराम धिंदळे, सयाजी अस्वले, पांडुरंग खाडे, सुरेश गभाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाजप आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे यांनी केले. तर आभार आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या