सासरच्या छळाला कंटाळून पाच महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या

0
मनमाड : सासरच्या छळाला कंटाळून दुर्गा प्रमोद गरुड या पाच महिन्याच्या गर्भवती तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मनमाड शहरातील संभाजीनगर भागातील घटना असून एक वर्षापूर्वीच दुर्गाचे लग्न झाले  होते.

कार खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा पती सतत तगादा लावत होता तिचा मानसिक छळ केला जात होता. त्यांच्या जाचाला कंटाळून दुर्गाने गळफास घेऊन जीवन संपवले.

मयत दुर्गाचे वडील वाल्मिक गंगाधर आढाव (रा.डोंगरगाव ता. शिल्लोळ,जि. औरंगाबाद) यांनी मनमाड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मयताचा पती प्रमोद गरुड व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*