Photo Gallery : शाळेचा पहिला दिवस : कुणी रडले, तर कुणी गेले मधल्या सुट्टीत पळून

2

देशदूत डिजिटल चमू

आज शाळेचा पहिला दिवस. अनेक दिवसांपासून शाळेला जाण्यासाठी आतुरलेले मुलं आज प्रत्यक्षात आज मात्र घाबरत घाबरत शाळेला आली.

अनेक विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन झाले. काहींना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात आली. नाशिकमधील रेड क्रॉस सिग्नल येथील सरस्वती विद्या मंदिरात येथे आलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत झाले. त्यामुळे येथील परिसर ढोल ताश्यांच्या गजराने दणाणून निघाला होता.

वर्गशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ओवाळण्यात आले त्यानंतर त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. अनेकांना गोड जेवणाचा आस्वाद आज घेता आला.

आई – वडील शाळेतून निघून जातांना मात्र कुणी मुले रडू लागले तर कुणी आपल्या आई वडिलांना वर्गातच बस असे सांगितले. रडणाऱ्या मुलांना वर्गशिक्षकांनी चॉकलेट दिले. त्यानंतर मोठ्या आनंदाने आपल्या शिक्षकांशी जमून घेत स्वतःची ओळख या विद्यार्थ्यांनी करून दिली.

पहिलाच दिवस असल्याने अनेक विद्यार्थी शालेय गणवेशात दिसून आले नाहीत मात्र घरून दिलेला खाऊ, पाण्याची बाटली गळ्यात अडकवून मोठ्या उत्साहात हे विद्यार्थी आज शाळेत आले होते.

 

 

 

2 प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

*