वाळू तस्करांकडून महसूल अधिकार्‍यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

0
ग्रामिण पोलीस ठाण्यात वाळू तस्करांविरुध्द गुन्हा दाखल

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील सुरेगाव येथील गोदावरी नदीपात्रातील वाळूचा बेकायदेशीर उपसा करुन ती चोरुन वाहनामधून भरुन नेत असतां महसूल अधिकार्‍यांनी हटकले. या महसूल अधिकार्‍यांना वाळू तस्कराकडून शिवीगाळ दमदाटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली असून कोपरगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात दोघा वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ट्रकसह 9 ब्रास वाळू घेवून वाळू तस्कर पसार झाले आहे. 5 लाख 18 हजाराचा मुद्देमाल घेऊन महसूल यंत्रणेला धमकावून पळून गेले आहे.

सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हास यशवंत कवडे हे आपल्या कर्मचार्‍यांसह गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा चालू असून तीची विल्हेवाट वाहनाद्बारे होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर व वाळू वाहनांवर कारवाई करीत असताना सुरेगाव कडून एक वाळूने भरलेला ट्रक 9 ब्रास वाळू घेऊन शहा रोडकडे पळाला. तेंव्हा महसूल कर्मचार्‍यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला.

त्यावेळी शहा रोडवर अर्पित हॉटेलजवळ हा ट्रक थांबला. त्यावेळी त्यांनी या ट्रकचे फोटो काढीत यातील आरोपी किरण ज्ञानदेव शेलार रा. कोपरगाव व सचिन जाधव रा. कोपरगाव यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ व दमदाटी करुन मंडालाधिकारी कवडेंसह महसूल कर्मचार्‍यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व वाळूचा भरलेला ट्रक किंमत 5 लाख 18 हजाराचा घेऊन पळून गेले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी कवडे यांच्या फिर्यादीवरुन शेलार व जाधव यांचेवर गु.र.नं. 70/2017 भादंवि कलम 353, 379, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अशोक कुसाळकर पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*