Wednesday, April 24, 2024
Homeजळगावहवामानावर आणि निसर्गावर आधारित शेती करा-पंजाबराव डख

हवामानावर आणि निसर्गावर आधारित शेती करा-पंजाबराव डख

रावेर|प्रतिनिधी raver

शेतकरी पिक लावणी पासून कापणी पर्यंत राबतो आणि पिक काढणीच्या दिवशी गारपीट,वादळी पाऊसाने तोंडी आलेला घास निसटून जातो.यासाठी हवामानाचा अंदाज घेवून,निसर्गावर आधारित शेती करावी असा सल्ला पंजाबराव डख यांनी चिनावल (ता.रावेर) येथे शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.

- Advertisement -

Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’…Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’…

पुढे म्हणाले कि,तापमान वाढत असल्याने गारपीट व वादळाचा फटका शेतकर्यांना बसत आहे.आधी पाऊस ७ जून ला येत होता,आता पाऊस २० दिवस पुढे सरकला आहे.त्यानुसार पेरण्या कराव्यात.२७ जून पासून पावसाला सुरवात होते. पाऊसाने दिशा बदलली आहे,आता पूर्वेकडून पाऊस येत असल्याने भविष्यात दुष्काळ पडणार नाही असे देखील त्यांनी अंदाज व्यक्त केले.

हवेचा दाब निर्माण होऊन तापमान वाढल्याने अवकाळी पाऊस पडतो.त्यासाठी तापमान नियंत्रित करण्यासाठी निसर्गाचा समतोल साधण्याचा विचार झाला पाहिजे.यासोबत पाऊस येईल याबाबत निसर्ग व पक्षी काही सुतोवाच देतात,ते ओळखता आली पाहिजे यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले.नदी काठावरील दोन्ही बाजूने एक किमी अंतरावर वादळ येत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.मंदिरावर वीज पडत नाही,करणं मंदिराचे कळस हे कास्यच्या धातू पासून बनवलेले असल्याने त्या परिसरात गावात वीज पडत नाही.यामागे शास्त्रीय कारण आहे.

वीज कडाडट असतांना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये,वेळ आलीच तर पायाखाली लाकूड ठेवून उभे राहावे. १६ टक्के वीज हि झाडांवर पडते तर २८ टक्के प्रमाण उघड्या मैदानावर पडते.आता पाऊस अधिक पडत असल्याने,पिकांवर सीएमव्ही आणि करपा येत आहे.यासाठी शेतातील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी चर खोदुन पाणी बाहेर काढणे फायद्याचे राहील.

यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व तयारी  करावी.तर नुकसान टळेल असे ते म्हणाले.चार महिने आधी वातावरणाचा अंदाज घेऊन शेतकर्यांना माहिती देतो.लाखो लोकांना नुकसान टाळता येते प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना वेळोवेळी हवामनाची माहिती देत असल्याचे देखील डख यांनी सांगितले.

Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’…

- Advertisment -

ताज्या बातम्या