Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमालेगावी बिऱ्हाड मोर्चास सुरुवात

मालेगावी बिऱ्हाड मोर्चास सुरुवात

म्हेळुस्के | प्रतिनिधी | Mheluske

राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे थकीत कर्जदार शेतकऱ्यांना ओटीएस योजना लागू करावी व थकीत शेतकऱ्यांच्या जमीनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या (Nashik District Cooperative Bank) कार्यक्षेत्रात येणाऱ्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा (farmers) हजारोंच्या संख्येने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या मालेगावातील (Malegaon) निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा येऊन धडकला आहे.

- Advertisement -

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा.राजु शेट्टी (Former MP Raju Shetty)यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा धडकला असून मोर्चाला सर्वपक्षीय पाठींबा असल्याचे समजते. तसेच मोर्चेकरी शेतकऱ्यांचे मालेगाव येथील एम.एच.जी मैदानावर आगमन झाले असून बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

तसेच जोपर्यंत थकित कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाही आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे बिऱ्हाड आंदोलन सुरूच राहील असे शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केले आहे.

तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी (Police) बँरेक्टेटिंग लावून बंद केले असून परिसरात पोलीस अधीक्षक अनिकेत भारती (Aniket Bharti) यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या