शेतकरी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक

0

शेतकरी बचाओ कृती समिती स्थापन करणार : दहातोंडे 

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकरी मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारणीची आज (रविवारी) राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍न आणि मागण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी बचाओ कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी दिली.
शेतकर्‍यांनी पुकारलेले आंदोलन पुणतांबे गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी एकत्रितपणे बोलावून शेतकरी संघर्ष समिती स्थापना करण्यात येणार असल्याचे दहातोंडे यांनी स्पष्ट केले.
शेतकरी मराठा महासंघाने संपास पूर्ण पाठिंबा देवून प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. शेतकर्‍यांचा संप कोणत्याही पक्ष व संघटनेचा नसून शेतकर्‍यांच्या हितासाठी व न्याय मागणीसाठी आहे. जिल्ह्यात पुणतांबे येथे सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान मतभेद निर्माण झाले. त्यानंतर नाशिक मध्ये 4 जून रोजी शेतकरी मेळावा घेण्यात येवून सुकाणू समिती स्थापन करण्यात आली.त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींना स्थान देण्यात न आल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नगरमध्ये शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.
शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे, शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यावेळी करण्यात येणार आहे. तसेच शिवनेरी ते लाल किल्ला नवी दिल्ली अशी शेतकरी बचाओ रॉलीची तारिख यावेळी निश्‍चित करण्यात येणार असल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*