शेतकरी संप: नियोजनासाठी नगरमध्ये उद्या बैठक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – 1 जून पासुन प्रारंभ होणार्‍या शेतकरी संपाच्या नियोजनाच्या पार्श्‍वभुमिवर नगर येथील बाजार समिती,हमाल पंचायत सभागृहात नियोजन बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिलीआहे.
शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी 1 जून पासुन संपावर जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथुन या संपाची घोषणा झाली असून संप याशस्वी करण्याची जवाबदारी नगर जिल्ह्यावर आहे.संपात नेमका कसा सहभाग घेता येइल, त्यासाठी काय करायचे, दुध भाजिपाला अडवण्याची ठिकाणे निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकित सर्व शेतकरी संघटना तसेच शेतकरी संपात सहभागी होऊ इच्छिणार्‍या इतर संघटना व व्यक्तींनी बैठकिस उपस्थित रहावे.
संप काळात शेतकर्‍यानी दुध, भाजिपाला व इतर शेतीमाल विकू नये. नगर जिल्ह्यातिल व्यापारी संघटनांनी, हमाल मापाडी संघटना, वाहतुकदार संघटना, बाजार समिती कर्मचारी संघटना, दुध संघ यांनी आपला पाठिंबा जाहिर करावा.

रस्त्यावर उभारणार चौक्या
शेतमाल वाहतूक होवू नये यासाठी संप कालावधीमध्ये शेतकरी चौक्या उभारण्यात येणार आहेत.सदर ठिकाणे निश्चित करण्यासाठी व एकुण संपाचे नियोजन करण्यासाठी उद्या 30 मे रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान होणार्‍या बैठकीत विविध विषयावर चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

*