कर्जमाफीपूर्वीच आधारलिंकसाठी शेतकर्‍यांची लूट; महा ई-सेवा केंद्र चालकांची मनमानी

0

गणेश हापसे @ अहमदनगर
कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना आधार लिंक करणे आवश्यक आहे . त्यामुळे सध्या महा-ई सेवा केंद्रामध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत आहे. मात्र, नियानुसार आधार लिंकसाठी रुपये शुल्क असताना केंद्रचालक रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेवुन अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांची आर्थिक लुट करत असल्याचे दिसुन येत आहे.
सरसकट कर्जमाफी न केल्याने शेतर्‍यांच्या भावना अद्याप तीव्र आहेत. त्यातच कर्जमाफी करताना अटी व शर्ती घातल्याने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. संपावर जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत सरकारला झुकायला लावणार्‍या नगर जिल्हा तच आधारलिंकच्या नावाखाली लुट होते . हे विशेष . दुष्काळ, नापिकी, मालाला हमी भाव नाही .अशा अडचणींना तोंड देत बळीराजा स्व:ताला सावरत असताना पुन्हा पाऊसाने दडी मारली . त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. त्यातच त्याला आता दिवसा-ढवळा लुटले जात असताना तालुका व जिल्हाप्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधुन संताप व्यक्त केला जात असुन संबधितांवर कारवाई होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागुन आहे.

सध्या जिल्हा प्रशासनामार्फत चालणारी अधिकृत आधार नोंदणी केंद्र बंद आहेत.त्यामूळे आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी खासगी केंद्राकडून गोरगरीब व गरजुवंताची आर्थिक लुट केली जात आहे.एखाद्या व्यक्तीला आधारकार्डची गरज असल्यास अव्वाच्या सव्वा दर आकारला जातो.मात्र, अनेक जण आपले काम महत्वाचे असल्याने तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने दुकानदारांची फावलत असल्याचे दिसून येत प्रशासनाने बाबनिहाय शुल्क ठरवून दिले असताना अधिक शुल्क आकारले जात असल्याने शाशंकता निर्माण होत आहे.

तक्रार केल्यास तात्काळ कारवाई
आधार लिंकसाठी रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. याशिवाय नाविन, दुरुस्ती व विविध बाबी साठी केंद्र चालकांना दर निश्‍चित करून देण्यात आले. त्यापेक्षा अधिक शुल्क आकरणार्‍या केंद्र चालकांविरोधात यापुर्वी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे. अद्याप असा प्रकार असल्यास तक्रार प्राप्त होताच त्या चालकांचा परवाना रद्द करण्यात येईल .
– अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग)

LEAVE A REPLY

*