शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणे कठीण : आ. थोरात

0
सरकारच्या अवघड ऑनलाईन प्रक्रियेमुळे
संगमनेर (प्रतिनिधी) – काँग्रेस सरकारच्या काळात शेतकर्‍यांना कुठेही अवघड प्रक्रिया न राबवता सरसकट कर्जमाफी देण्यात आली. कुठलीही अवघड प्रक्रिया न राबविता ही कर्जमाफी दिली गेली. मात्र सध्याच्या सरकारने घोषणाबाजी करत अवघड व किचकट ऑनलाईन प्रक्रिया राबविल्याने राज्यातील लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचीत राहणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते माजी कृषी व महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
वरुडीफाटा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन आ. थोरात यांचे हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, कृषी सभापती अजय फटांगरे, उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प सदस्य रामहरी कातोरे, मिलींद कानवडे सिताराम राऊत, शांताबाई खैरे, पं. स. सदस्या प्रियंकाताई गडगे, किरण मिंडे, शिवाजी राहटळ, आर. बी. राहाणे, लक्ष्मणराव कुटे, साहेबराव गडाख, मोहनराव करंजकर, सुनंदा भागवत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आनंदा गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, स्व. भाऊसाहेब थोरात यांची नितांत श्रद्धा श्री. क्षेत्र बाळेश्‍वर देवस्थानवर होती. स्वातंत्र्यचळवळीत या पठार भागाने त्यांना मोठी साथ दिली. धर्माजी पोखरकर यांचे मोठे योगदान राहिले आहे. एक विद्वान व्यक्तीमत्व ते होते. पठारभागाने कायमच विकास कामांना पाठींबा दिला आहे. आमदारकी वगळता सर्व निवडणुकांचा सबंध तालुक्याशी येतो.
सध्याच्या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकर्‍यांशी काहीही देणे घेणे नाही. सरकारने कर्जमाफीची केवळ पोकळ घोषणा केली आहे. अवघड व किचकट प्रणालीमुळे अजूनही दोन वर्षे कर्जमाफी मिळणे अवघड वाटते. शेतकर्‍यांना मदत करतांना कमी जास्त पाहू नका. शेतकर्‍यांना हमीभाव द्या अशी मागणी करतांना आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना आपण गती देणार असल्याची ग्वाहीही आ. थोरात यांनी दिली.
थोरात कारखान्याने उभी केलेली स्वागत कमान सदैव प्रेरणा देत राहील असे मनोगत आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. अजय फटांगरे म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली पठार भागात सातत्याने विकास योजना राबविणार आहोत.
यावेळी बाळासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, अवधूत आहेर, संतोष मांडेकर, विलास कवडे, बापूसाहेब गिरी, बापू जाधव, रेवजी नाना घुले, सुहास वाळुंज, गणेश सुपेकर, तुळशीराम भोर, अर्जुन घुले, इंद्रजीत खेमनर, भास्कर पानसरे, गोपीनाथ आगलावे, विनायक फटांगरे, एम. एम. फटांगरे, संदीप भागवत, तुकाराम फटांगरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राघू जाधव यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार भरत जाधव यांनी मानले.

 सावरगाव घुलेच्या रोहकुंड बंधार्‍याचे जलपूजन –  आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून बांधलेल्या सावरगाव घुले येथील रोहकुंड बंधार्‍याचे जलपूजन आ. थोरात यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बाळेश्‍वर देवस्थान येथे विधीवत पूजा करुन बाळेश्‍वर देवस्थानला अभिषेक करण्यात आला. राज्यात भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखी होवू दे अशी प्रार्थना आ. थोरात यांनी केली.

LEAVE A REPLY

*