दिवाळीपूर्वी कर्जमाफी न दिल्यास भाजप-सेनेच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : दिलीप वळसे

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वर्षापूर्वी खोटी स्वप्ने, खोटी आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आले. ज्या सोशल मिडियाचा वापर करत करत मोंदींनी सत्ता मिळवली तोच सोशल मिडिया आता त्यांच्या विरोधात गेला आहे. अच्छे दिन, नोटा बंदी, महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढलेल भाव, शेतकरी आत्महत्या, शेत मालाचे पडलेले भाव, काळा पैसा परत आणण्याचे पोकळ आश्वासन या विरोधात राष्ट्रवादी सर्वसामान्यांच्या भावना घेऊन राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. दिवाळी पूर्वी राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्यास भाजप आणि सेनेच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे यांनी नगरमध्ये दिला.

राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वळसे बोलत होते. यावेळी आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, निरिक्षक अंकूश काकडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, महिला अध्यक्षा मंजूषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, नरेंद्र घुले, पांडूरंग अंभग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, बाबासाहेब भिटे, सुजीत झावरे, सुप्रिया झावरे, सबाजी गायकवाड, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, अरविंदे शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुरूवातील डॉ. आंबेडकर पुतळा येथून राष्ट्रवादीचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयावर चालू आले. सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बैल गाड्या घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी महिलांची संख्या मोठी होती. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
यावेळी बोलतांना वळसे म्हणाले, पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी वेगवेळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून सरकार विरोधात सर्वसामान्यांच्या भावना पोहचवणार आहेत. भाजप सरकार सोशल मिडिया, टिव्ही चॅनेल, जाहिरातीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत गेल्या 60 देशात काहीच झाले नसल्याचे भासवले. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने तीन वर्षात एकही अच्छ दिवस दाखवला नाही. काळापैशाच्या नावावर नोटा बंदी केली.
देशाच्या सीमेपलिकडून दहशवाद सुरू असून देशातंर्गत जाती-जातीत फुट पाडण्याचे काम सुरू आहे. कोपर्डी घटना, मराठा आरक्षणासारखे अनेक प्रलंबित ठवण्यात आले आहेत. पेट्रोलवर 11 रुपये प्रति लिटर कर लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्‍यांना मदत कराची सोडून बुलेट ट्रेनसाठी 35 हजार कोटी देण्याची तयारी दर्शवली असल्याचा आरोप वळसे यांनी यावेळी केला.
यावेळी अंकूश काकडे, गुंड, ढाकणे, फाळके, शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवदेन देण्यात आले.
……..
महिला जिल्हाध्यक्ष गुंड यांनी मोदी सरकार अच्छा तेरा खेल है… सस्ती हूई दारू और मेहंगा हूआ तेल या शब्दात भाजप सरकारवर टीका केली.

गेल्या तीन वर्षात राज्यातील वीज मंडळाची भाजपा सरकारने वाट लावली आहे. पुढील सहा महिन्यांत सरकारकडे वीज मंडळाच्या कामगारांचे पगार देण्यासाठी पैसा राहणार नाही. सध्या कोसळा आणि वीज खरेदीसाठी पैसा नसून यामुळे राज्यात भारनियमन सुरू असल्याचा आरोप वळसे यांनी केला. 

 

LEAVE A REPLY

*