रायपुरला वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

0
चांदवड| तालुक्यात कळवण येथून बाजरी सोंगणीसाठी आलेल्या मजुराचा रायपूर येथील शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.
चांदवड तालुक्यात सध्या बाजरी सोंगणीला सुरूवात झाली असून यासाठी दरवर्षी कळवण तालुक्यातील काठरा येथील मजुरांची टोळी येते.
याच टोळीतील मजुर निंबाळे शिवारातील शेतात बाजरी सोंगणीनंतर चारा बांधणी करत असतांना दुपारी ३.३० च्या सुमारास वीजांचा कडकडाट सुरू झाला, यात रामा मन्साराम बर्डे (वय ४५) या मजुराच्या अंगावर वीज कोसळल्याने तो शेतात कोसळला.
सोबतच्या मजुरांच्या मदतीने सरपंच दत्तू कोल्हे यांनी त्याला चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. यावेळी उपस्थित असलेल्या वैद्यकिय अधिकार्‍यांनी मात्र त्याला मृत घोषीत केले.
याबाबत डॉ. गांगुर्डे यांच्या खबरीवरून चांदवड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामा याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कळवण तालुक्यात पाठविण्यात आला.

LEAVE A REPLY

*