शिवारसंवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री सुरक्षित

0

नाशिक, ता. २५ : शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासोबतच जलसंधारण व शेततळ्यांचे काम पाहण्यासाठी लातूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर काही वेळापूर्वी उड्डाणादरम्यान कोसळले.

या अपघातात मुख्यमंत्री बचावले असून त्यांच्या हाताला खरचटले आहे.

सध्या ते त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी आराम करत आहे.

आमच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला मात्र मी व माझे सहकारी सुखरूप आहोत असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिवार संवाद उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी निलंगा तालुक्यातील हलगरा येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधून श्रमदानही केले. तसेच सकाळची न्याहारीही त्यांच्यासोबत केली. यावेळी संभाजी निलंगेकर  त्यांच्यासोबत होते.

या अपघातात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

CM Devendra Fadanvis Maharashtra

शिवारसंवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री सुरक्षित (See More : http://www.deshdoot.com/fadnvis-chopper-crash-land-near-nilanga-cm-is-safe/)अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ नक्की बघा…!!

Posted by Deshdoot on 25 मे 2017

असा झाला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

LEAVE A REPLY

*