#Facebook : ‘तुमचा चेहरा’च असणार तुमच्या ‘फेसबुक’चा पासवर्ड!

0

अनेकांना फेसबुकचा पासवर्ड सहसा लक्षात राहत नाही. यासाठी फेसबुक सध्या फेस रिकग्नेशन या नव्या पर्यायाची चाचणी करत आहे.

त्यामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुक अनकलॉक करता येणार आहे. ‘टेकक्रंच’ने फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे.

फेसबुकसाठी फेशियल रेकग्निशन हे तंत्र काही नवं नाही. तुमच्या सोबत फोटोमध्ये इतर मित्र मैत्रीणी असतील तर त्यांची नाव काय आहेत हे फेसबुक अगदी अचूक ओळखतो. तेव्हा एखाद्या मित्राला टॅग करताना तुम्हाला त्याच्या नावाची शोधाशोध करावी लागत नाही. आता याच फीचरचा वापर लॉग इन करण्यासाठी होऊ शकतो का, याची चाचणी सुरू आहे.

हे फीचर कधी येईल याची तुर्तास तरी माहिती उपलब्ध नाही.

अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल x हा फोन लाँच केला होता. यात फेशियल रेकग्निशनचे फीचर देण्यात आलं आहे.

अशाच प्रकारचं फीचर फेसबुकमध्येही उपलब्ध होणार याची चर्चा असल्याने अनेकांना याबद्दल उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

*