#Facebook : फेसबुकच्या दोन नवीन फिचर्सविषयी तूम्हाला माहिती आहे का ?

0

फेसबुकमध्ये दोन नवीन सुविधा येत्या काही काळात लाँच करण्यात येणार आहेत.

‘रेड एन्व्हलप’ आणि ‘ब्रेकींग न्यूज’ अशी या नव्याने येणाऱ्या फिचर्सची नावे असून त्यामुळे फेसबुक वापरणे आणखी सोपे होणार आहे.

कोणाला पैसे पाठवायचे असल्यास रेड एन्व्हलप हे फिचर उपयोगी ठरणार आहे.

नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झालेली असताना अशाप्रकारचे फिचर ही काळाची गरज आहे. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकच्या या फिचरचा फायदा होणार आहे. याशिवाय ब्रेकींग न्यूज या सुविधेमधून ताज्या घडामोडी यूजर्सना अगदी सहज कळू शकणार आहेत. या दोन्ही नव्याने येणाऱ्या सुविधांची अद्याप अधिकृत चाचणी झालेली नाही.

सध्या फेसबुकचे 207 कोटी युजर्स असण्याची शक्यता आहे. त्यातील जवळपास 27 कोटी युजर्स बनावट असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*