नेत्रदानाने आणले डोळ्यात पाणी! : पारनेरच्या जवानाची मृत्युसमयी समाजसेवा

0
पारनेर (प्रतिनिधी) – शहरातील जवान संदीप व्यवहारे याचा सुट्टीवर आला असता 28 सप्टेंबर 2017 रोजी नगर येथे एका अपघातात मृत्यू झाला. उपचारादरम्यान जवान व्यवहारे यांना मृत्यूसमय जवळ आल्याचे दिसताच त्यांनी नेत्रदान करण्याची इच्छा नातेवाईकांकडे व्यक्त केली.  नेत्रदानाच्या संकल्पाने देशसेवेबरोबरच अंतिमसमयी देखील समाजसेवा करून अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या संकल्पाने तरुणांना समाजसेवेचा संदेश दिला.
पारनेर शहरातील आनंदनगरमध्ये राहणारा जवान संदीप व्यवहारेेे हा युवक लष्करात नोकरीला होता. तो सुट्टीसाठी गावी आला होता. नगर येथे सासूरवाडीला पाहुण्यांना भेटावयास गेला होता. त्यावेळी वेगाने येणार्‍या वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक बसल्याने डोक्याला मार लागला. नगर येथील एका खाजगी दवाखान्यात ताबडतोब दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना शुद्धीवर आल्यानंतर त्याने स्वत:चे नेत्रदान करण्याची इच्छा नातेवाईकांकडे बोलून दाखविली. त्यानुसार त्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी नातेवाईकांच्या परवानगीने नेत्रदान केले.
पारनेरच्या संगमेश्वराच्या घाटावर जवानाच्या दशक्रिया विधीप्रसंगी प्रवचनकार डॉ. आर. जी. सय्यद यांनी जवान व्यवहारेंच्या कार्याचे वर्णन सांगताना उपस्थित सर्वांचे हृदय हेलावले.

 

LEAVE A REPLY

*