त्र्यंबकेश्वरजवळ पाहूयात काजव्यांचं चांदणं

0

मॉन्सूनची चाहूल लागण्यापूर्वीच जंगलात काजव्यांचा चमचमाट सुरू होतो.

त्र्यंबक परिसरातील दाट जंगलात काजव्यांचा वावर असतो. काजव्यांचा जंगलातील चमकणारा अधिवास रात्रीच्या वेळी नेत्रसुखद ठरतो. काजव्यांचे हे चांदणं पाहणं हा विलक्षण अनुभव असतो. ‘

गेट आऊट आऊटडोअर’ तर्फे हा अनुभव नाशिककरांना घेता येणार आहे, एका छोटेखानी जंगल सफारीद्वारे. या सफरीदरम्यान रात्री तंबूत मुक्काम करण्याची हौसही भागविता येईल.

येत्या ३ आणि ४ जूनला ही काजवा यात्रा संपन्न होणार आहे.

जंगलामध्ये तंबूतील मुक्काम, रात्री काजव्यांचे निरीक्षण सकाळी पक्षीनिरीक्षण, तिथेच केलेले जेवण, आणि कसारा, इगतपुरी मार्गे पुन्हा नाशिककडे परतणे असा हा सुटीचा निवांत कार्यक्रम आहे.

अर्थात यासाठी प्रवेश मर्यादित आहेच शिवाय काजव्यांच्या वर्तनानुसार सफरीच्या तारखा पुढे-मागेही होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संपर्क : अश्विन : 9823111427, सौरभ :9049988254

LEAVE A REPLY

*