Saturday, April 27, 2024
Homeनगरपारनेरमध्ये महावितरण कार्यालयात हल्लाबोल आंदोलन

पारनेरमध्ये महावितरण कार्यालयात हल्लाबोल आंदोलन

पारनेर (तालुका प्रतिनिधी) –

राज्यभरात महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठविली होती. त्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे महावितरण

- Advertisement -

कार्यालयात भारतीय जनता पक्षाकडून टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या तालुक्यात शेतकर्‍यांकडून वीजपंपाद्वारे पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे. अशातच महावितरणकडून शेतकर्‍यांची वीजकोंडी करण्यात येत होती. त्यामुळे शेतकर्‍यांची हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे महविकास आघाडी सरकारविरोधात जनतेचा रोष वाढत होता. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनीही सरकारला घरचा आहेर दिला होता.

भाजपकडून महावितरण विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पारनेर येथे असणार्‍या महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत फुलाजी चेडे, तालुका उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, रघुनाथ आंबेडकर, संभाजी आंबेडकर, बाबासाहेब चेडे, कैलास सोंडकर, आप्पासाहेब दुधाडे, बबन डावखर, चंद्रकांत सोबले, दादाभाऊ दुधाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या