ग्रामपंचायत पोटनिवडणूक रणधुमाळी

0

14 बिनविरोध तर,इतरत्र 27 रोजी निवडणूक

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतमधील रिक्त जागेसाठी शनिवार 27 मे रोजी निवडणूक आहे.त्यापैकी 15 जणांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दिली.
जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतीमध्ये राजीनामा, मयत आदी कारणामुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक जुन ते सप्टेंबर 2017 या कालावधीत घेणे बंधनकारक आहे. त्या पार्श्‍वमुमिवर जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यात अकोले तालुक्यात सर्वाधिक 37 जागा रिक्त असून एकाही जागेवर नामनिदेॅनपत्र दाखल नाही.
हे विशेष, दरम्यान इतर 26 ठिकाणी 74 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 68 वैध ठरले.28 जणांनी माघार घेतली असून 25 जण रिंगणात आहेत.बिनविरोध उमेदवारांची तालुकानिहाय नावे- संगमनेर-चंद्रभागा तुपसुंदर (तिगाव), पारनेर-सचिन वराळ (निघोज), रुपाली साठे (शिरापूर), कोपरगाव- दिलीप घुले (रंवदे), विवेक परजणे (संवत्सर), राहुरी- ताईबाई मधे (वावरथ)पाथर्डी- गोपिनाथ घुले (शेकटे), श्रीगोंदा-शालन देवीकर (माठ), अनिता साळवे (मुंगुसगाव), नेवासा-लता घोलप (मुकिंदपूर), मंगल धिवरे (पिचडगाव) व नगर-सुनिता तापकिरे (बुर्हाणनगर), विलास खुडे (वडगाव तांदळी), प्रकाश ठाणगे (भोरवाडी), विद्या रुपनर (निमगाव घाणा) आदींची बिनविरोध निवड झाली आहे.यामध्ये नगर तालुक्यातील सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे.

पिंपळगावउजैनी : 24 उमेदवार रिंगणात
जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतीमधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असताना नगर तालुक्यातील पिंपळगावउजैनी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 27 मे रोजी होत आहे. त्या ठिकाणी 11 जागेसाठी 32 जणांनी अर्ज भरले.त्यापैकी 8 जणांनी माघार घेतली आहे. 

.

LEAVE A REPLY

*