जिल्हा नियोजन समिती निवडणूक ; फटांगरे, कानवडे, भांगरेंचा अतिरिक्त अर्ज बाद

0

29 जागांसाठी 62 उमेदवार रिंगणात

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दाखल उमदेवारी अर्जातून शनिवारी झालेल्या छाननीत 71 अर्जांतून 9 अर्ज बाद झाले आहेत. आता नियोजन समितीच्या 29 जांगासाठी 62 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. बाद झालेल्या अर्जांत जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातून जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, सदस्य मिलिंद कानवडे, तर अनुसूचित जमाती मतदारसंघातून सदस्य सुनीता भांगरे यांचे अर्ज बाद झाले आहे. मात्र, अन्य प्रवर्गातून या तीनही सदस्यांचे अर्ज वैध असल्याने त्यांचा नियोजन समितीमधील प्रवेशाचा मार्ग खुला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी येत्या 28 तारखेला मतदान हाणार आहे. यासाठी शुक्रवार (दि. 4) उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या दिवशी ओबीसी प्रवर्गातील महिलांच्या 5 जागांसाठी 5 अर्ज आल्याने आणि अनुसूचित जाती मतदारसंघात 2 जांगासाठी 2 अर्ज आल्याने नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील 7 जागा आधीच बिनविरोध झालेल्या आहेत. आता उर्वरित 29 जांगासाठी छाननीनंतर 62 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी बाद झालेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे सभापती फटांगरे, सदस्य कानवडे, भांगरे यांचा समावेश आहे. मात्र, फटांगरे आणि कानवडे यांचा ओबीसी पुरुष तर भांगरे यांचा सर्वसाधारण महिला मतदारसंघातील उमेदवारी अर्ज वैध आहे.

बाद झालेल्या उर्वरीत अर्जामध्ये नगरपंचायत मतदारसंघातून सीमा राजेंद्र मापारी, पूजा संतोष म्हेत्रे, लहान नागरी निर्वाचन मतदारसंघातून राधा संजय साळवे, प्रणिती चव्हाण, चंद्रकला भाऊसाहेब डोळस व ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून संगीता बन्सी गांगुर्डे यांचा समावेश आहे. नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी माघारीसाठी 14 तारीख अंतिम आहे. या दिवशी सर्व पक्षांमध्ये एकमत झाल्यास याच दिवशी जिल्हा नियोज समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*