पात्र उमेदवारांच्या यादीवरच पक्ष संघटनेच्या निवडणुका होतील ; ससाणे

0
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष संघटनेच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी
श्रीरामपूर (प्रतिनिधी) -अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेच्या संघटनात्मक निवडणुकीकरिता महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले प्रदेश निवडणूक अधिकारी महेश जोशी यांच्या आदेशावरुन अहमदनगर जिल्ह्यातील 15 मे 2017 पर्यंत झालेल्या सभासद नोंदणी तसेच पात्र उमेदवारांच्या यादीवरच पक्ष संघटनेच्या निवडणुका होतील, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार जयंतराव ससाणे यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यात 15 मे 2017 पर्यंत सर्व तालुक्यात 3391 बुथमधून ए़कूण 82 हजार 480 सभासद नोंदणी झालेली असून 6 हजार 372 सभासद उमेदवारीसाठी प्राप्त असणार आहेत. सदरची यादी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये 6 ऑगस्टपासून उपलब्ध असणार असल्याची माहिती ससाणे यांनी दिली. निवडणुकीचा कार्यक्रम प्रदेश काँग्रेसच्यावतीने नुकताच प्रसिद्ध झाला असून 7 ते 20 ऑगस्ट या कालावधीत तालुका अध्यक्ष व बुथ अध्यक्षांची निवडणूक होणार असून 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत ब्लॉक कमिटीतून 6 सदस्य जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी व 1 सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटीसाठी निवडून द्यावयाचा आहे.
तसेच 5 ते 15 सप्टेंबर या दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यासाठी निवडणूक होणार असून 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष व खजिनदार, सरचिटणीस तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीमधून भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीसाठी व अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. अशा प्रकारे निवडणुकीचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रसिद्ध केले असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार जयंतराव ससाणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*