जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन ‘इलारी नॅनोफोन सी’ लाँच; 30 ग्रॅम वजन!

‘Yerha’ या संकेतस्थळाने ‘इलारी नॅनोफोन सी’ भारतात लाँच केला आहे.

हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन आहे. हा जीएसएम (GSM) फोन क्रेडिट कार्डच्या आकाराचा आहे.

ज्याची किंमत भारतात 3 हजार 940 रुपये ठेवण्यात आली आहे.

भारतात हा फोन ब्लॅक, रोज गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनचं वजन 30 ग्रॅम आहे. हा फोन स्टायलिश, छोटासा आणि अँटी-मोबाईल स्मार्टफोन आहे. सक्रिय जीवनशैली असताना ज्यांना व्हर्च्युअल जगातून स्वतःला दूर ठेवावं वाटतं, अशांसाठी हा स्मार्टफोन तयार करण्यात आला असल्याचं कंपनीने सांगितलं.

‘इलारी नॅनोफोन सी’चे फीचर्स

  • 1 इंच आकाराची स्क्रीन
  • मीडियाटेक MT6261D चिपसेट प्रोसेसर
  • 32 MB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज
  • ड्युअल सिम स्लॉट
  • 280mAh क्षमतेची बॅटरी
  • MP3 प्लेयर, FM रेडियो, फोन रेकॉर्डिंग

LEAVE A REPLY

*