गुणवत्ता वाढीसाठी सरसावला शिक्षण विभाग

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकार्‍यांनी काय करावे? वेगवेगळे उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेत राबवून या शाळा आणि त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढवावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात शनिवारी जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांची एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा विळद घाट येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात पार पडली. यावेळी जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले, शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, उपशिक्षणाधिकारी पोपट काळे, अंकुश जंजिरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्षा विखे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसह अधिकार्‍यांनी विशेष भर देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी या विद्यार्थ्यांसाठी वेळ द्यावा, असे आवाहन केले. उपाध्यक्षा घुले यांनी शिक्षकांनी रजेवर जाताना आधी रजा मंजूर करूनच रजेवर जावे. विद्यार्थी गळती आणि शालेय पोषण आहारावर लक्ष केंद्रित करावे असे सूचित केले.
परजणे यांनी शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणा आणि शिक्षकांनी व्यसन करू नये. शाळेच्या येण्याजाण्याच्या वेळा पाळाव्यात. ओळखपत्र सोबत ठेवून शालेय वेळेत मोबाईल वापर टाळावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील 100 टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजे असे आवाहन शिक्षणाधिकारी काटमोरे यांनी केले.

कार्यशाळेद्वारे गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी जॉबचार्टनुसार शाळा तपासणी करून शाळा स्वयंपूर्ण कशा होतील, पटसंख्या कशी वाढेल, शैक्षणिक गुणवता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेला गुणवत्ता वाढीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य शाळा भेटी देणार असून त्रुटी आढळ्याास पर्यवेक्षीय यंत्रणेवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे यांनी आपल्या भाषणात कार्यशाळा घडवून आणल्याबद्दल परजणे यांचे आभार मानले. मराठवाड्यापेक्षा नगर जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत 150 पुढे आहे. शालेय पोषण आहारचे महत्व विषद त्यांनी शेरोशायरीचा आधार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी, आदी बाबत छोट्या छोट्या टिप्स दिल्या.

LEAVE A REPLY

*