संगमनेर : बोटा शिवारात भूकंपाचे धक्के

0

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना गुरुवार द़ि 7 रोजी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला.

2.6 रिस्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
बोटा व परिसरात गेल्या वर्षीही जानेवारी महिन्यात पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात भूकंपाचे 9 धक्के बसले होते.

त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुन्हा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यानंतर आज पुन्हा बोटा, केळेवाडी, माळवाडी, आंबी-दुमाला, कुरकुटवाडी गावांना भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता 2.6 रिस्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली.

दरम्यान या भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी महसूल विभागाची यंत्रणा भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांमध्ये पाठविली आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, तसेच पडझड झालेल्या घरांमध्ये राहणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार सोनवणे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*