औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद; 5 हजार विक्रेत्यांचा सहभाग; ऑनलाईन विक्रीवर बंदीची मागणी

0
नाशिक : ऑनलाईन औषध विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर निर्बंध घालण्यात यावेत. औषधविक्रि संदर्भात करण्यात आलेली किचकट नियमावली शिथील करण्यात यावी या मागण्यांसाठी ऑल इंडीया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने 30 मे रोजी एकदिवसीय बंद पुकारला आहे. यात नाशिक जिल्हयातील पाच हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.

ऑनलाईन औषध विक्री ही घातक असून त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. आरोग्य खात्यासह कुटुंबकल्याण मंत्रायल, पंतप्रधान कार्यालय येथे निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आल्याचे बागरेचा यांनी सांगितले. औषध विक्री ही फार्मासिस्टच्या उपस्थितीतच व्हायला हवी, असा कायदा आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे या कायद्याचे उल्लंघन होणार आहे.ऑनलाईन औषण विक्रिमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्रीला केमिस्ट असोसिएशनने विरोध दर्शवला आहे.

त्याचप्रमाणे शासनाने इ-पोर्टल नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामध्ये औषध उत्पादकापासून डिस्ट्रिब्युटर, सबडिस्ट्रिब्युटर, केमिस्ट या सर्वांना एकाच औषधाची ऑनलाईन नोंद ठेवावी लागणार आहे. शिवाय ते औषध कोणत्या रुग्णाला कोणत्या डॉक्टरांनी दिले त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय ऑनलाईन नोंद पूर्णच होणार नाही.

असा क्रमांक एमबीबीएस डॉक्टर्सशिवाय ग्रामीण भागात सेवा देणार्‍या बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टरांकडे नसतो. तसेच ग्रामीण भागात वीज नसल्याने इंटरनेट सेवाही मिळत नाही. अशा अनेक अडचणी असल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने हे दोन्ही निर्णय मागे घ्यावे याकरता हा बंद पुकारण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे पाच हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती नाशिक केमिस्ट असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी हेमंत पाठक, अतुल अहिरे, मयूर अलई, प्रशांत पवार, गिरीश महाजन, रत्नाकर वाणी, महेश भावसार, मनोज लोढा, जगदीश भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*