नगरच्या उड्डाणपूल व रिंग रोडप्रश्‍नी आमदार डॉ.तांबेंची विधिमंडळात लक्षवेधी

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील उड्डाणपूल व रिंगरोडचे रखडलेले काम तातडीने पूर्ण व्हावे अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीव्दारे केली आहे.
शहरात कायम बहुचर्चित राहिलेल्या उड्डाणपुलाचे काम रखडलेले असल्याने शहरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आहे.शहरातून जाणार्‍या औरंगाबाद -महामार्गाच्या कामात उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश करणे गरजेचे आहे.मात्र,संबंधित कंपनी पुलाचे काम करण्यास तयार नाही.अर्धवट स्थितीत असलेला रस्ता व उड्डाणपुलाचे कामही अपूर्ण आहे.
त्यामुळे शहराच्या विकासात अडचणी येत आहेत. याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार व निवेदन अनेकदा देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.दरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रश्‍नाची दखल घेत सदर उड्डाणपुलाचे बांधकाम भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून करण्यात येणार असून लवकरच पुर्ण करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले.
सदर प्रश्‍नांवर विधान परिषदेत एक-दोन तासांची सविस्तर चर्चा होणार होती. मात्र,मराठा क्रांती मोर्चामुळे सदर चर्चा दोन दिवसांत पुन्हा होणार असल्याचे सांगण्यात आले.सदर प्रश्‍नाच्या पूर्ततेसाठी सत्यजित तांबे यांनी वेळोवेळी संबंधित विभागाचे मंत्री,अधिकारी आदींसह दिल्ली दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

LEAVE A REPLY

*